आंबा पाककृती/ इंडियन फूड पाककृती/ मुलानं साठी पाककृती/ स्वीट डिश पाककृती

आंबा नारळ बर्फी रेसिपी – Amba Barfi Recipe in Marathi

Amba Barfi Recipe in Marathi


Amba Barfi Recipe in Marathi

आंब्याचा उपयोग करून भरपूर पाककृती तयार केल्या जातात. आंब्याची बर्फी सर्वात सोपी कृती आहे आणि म्हणूनच आज आपण नारळ आणि आंबा बर्फी बनवणार आहोत. या बर्फीसाठी मावा वापरलेला नाही, तरीही ही बर्फी अतिशय चवदार लागते.

आंबा नारळ बर्फी रेसिपी - Amba Barfi Recipe in Marathi

Print Recipe

Recipe By: Serves: 4 Prep Time: 10 Minutes Cooking Time: 30 Minutes

Recipe Category: Sweet Dish Recipes Recipe Cuisine: Indian Calories: 280 calories4 serve

वर्णन

आंब्याचा उपयोग करून भरपूर पाककृती तयार केल्या जातात. आंब्याची बर्फी सर्वात सोपी कृती आहे आणि म्हणूनच आज आपण नारळ आणि आंबा बर्फी बनवणार आहोत. या बर्फीसाठी मावा वापरलेला नाही, तरीही ही बर्फी अतिशय चवदार लागते.

साहित्य

  • 1 कप आंब्याचा रस
  • २ कप खवलेला नारळाचा चव
  • १/२ कप साखर
  • १ मोठा चमचा पिस्ता बारीक चिरलेला
  • १ मोठा चमचा बदाम बारीक चिरलेला
  • १/२ चमचा वेलची पूड
  • १ मोठा चमचा तूप

रेसिपी वीडियो

Mango Burfi Recipe - How to make Mango Coconut Burfi OR Mango Nariyal Burfi Recipe in Hindi

कृती

1

कढईत तूप टाकून गरम करून घ्या.

2

तूप गरम झाल्यावर त्यात नारळ आणि साखर टाकून १ मिनिटे ढवळत राहा.

3

आता यात आंब्याचा रस टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे.

4

मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पूड घालून वेलची मिक्स करून घ्यावे.

5

हे मिश्रण ज्या वेळेला कढई सोडू लागेल त्या वेळेला समजावे कि मिश्रण चांगले शिजले आहे. गॅस बंध करून घ्यावे.

6

आता एका ताटाला तुपाचा हात लावून घ्यावे जेणे करून बर्फी ताटाला चिकटणार नाही.

7

आता मिश्रण प्लेटवर पसरवा. वरून पिस्ता आणि बदामाचे काप घालून सजवून घालावे आणि हलकेच दाबावे.

8

आता बरफी मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर बर्फी चे तुकडे करावे.

9

सर्व्ह करा आणि चवदार बर्फीचा आनंद घ्या.

सूचना

  • आपण साखर आवडी नुसार कमी जास्त करू शकता.
  • आवडी नुसार सुका मेवा वापरू शकता.

हि कृती आवडल्यास, कृपया माझे Subscribe my YouTube Channel. आपल्याला काही शंका असल्यास आपण मला खाली दिलेल्या टिप्पणी विभाग तर्फे संप्रर्क करू शकता मी आपल्या शंकांना लवकरात लवकर उत्तर पाठवायचा प्रयत्न करेन. माझ्या वेबसाईट ला विझिट केल्या बद्दल आपले मनापासून आभार.

You Might Also Like

0 Comments

Leave a Reply