इंडियन फूड पाककृती/ न्याहारी पाककृती/ मुलानं साठी पाककृती/ लंच बॉक्स पाककृती

कुरकुरीत पालक पूरी रेसिपी – Kurkuri Palak Puri Recipe in Marathi

Kurkuri Palak Puri Recipe in Hindi


Kurkuri Palak Puri Recipe in Marathi

आज आपण कुरकुरीत पालक पुरी बनवूया. पुरीला टेस्टी आणि हेल्दी बनवली आहे. मुलांना पालक खायला आवडत नाही, त्यावेळी आपण मुलांना पालक पुरी खायला देऊ शकतो. ही पुरी चहा बरोबर खायला खूप छान लागते. मुलांना डब्यात ही पुरी देऊ शकता. प्रवासाला जाताना ही पुरी नेवू शकता. खूप सोप्या पद्धतींनी तुम्ही पुरी बनवू शकता. पालक पुरी २० ते २५ दिवस चांगली टिकते.

कुरकुरीत पालक पूरी रेसिपी – Kurkuri Palak Puri Recipe in Marathi

Print Recipe

Recipe By: Serves: 4 Prep Time: 10 Minutes Cooking Time: 45 Minutes

Recipe Category: Pizza Recipe Cuisine: Indian Calories: 376 calories4 serve

वर्णन

आज आपण कुरकुरीत पालक पुरी बनवूया. पुरीला टेस्टी आणि हेल्दी बनवली आहे. मुलांना पालक खायला आवडत नाही, त्यावेळी आपण मुलांना पालक पुरी खायला देऊ शकतो. ही पुरी चहा बरोबर खायला खूप छान लागते.

साहित्य

  • १ कप पालक बारीक चिरलेला
  • १ १/२ कप गव्हाचे पीठ
  • २ टेबलस्पून बारीक रवा
  • १/२ टीस्पून काळीमिरी पूड
  • १/२ टीस्पून ओवा
  • १ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीप्रमाणे

रेसिपी वीडियो

Teatime Snack - Palak Puri - Palak Puri Recipe in Hindi - How to make Palak Puri

कृती

1

एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, चिरलेला पालक, कालीमिरी पूड, ओवा, तेल आणि चवीप्रमाणे मीठ टाका.

2

आता थोडे थोडे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्या.

3

पालकला पाणी सुटते त्यामुळे पाणी कमी लागते.

4

पीठ झाकून अर्धा तास ठेवा.

5

अर्ध्या तासानंतर पिठाला थोडेसे तेल लावून मळून घ्यावे.

6

छोटे छोटे गोळे बनवून पुरी लाटून घ्यावी.

7

लाटून झाल्यावर सुरीने टोचे मारून घ्यावे. म्हणजे पुरी फुगणार नाही.

8

अशा प्रकार सर्व पुऱ्या लाटून सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्याव्या.

9

कुरकुरीत पालक पुरी खायला तयार आहेत.

सूचना

  • गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरू शकता.
  • पालक आधी धुऊन मग चिरावा. मोठे देठ कापून टाका.

हि कृती आवडल्यास, कृपया माझे Subscribe my YouTube Channel. आपल्याला काही शंका असल्यास आपण मला खाली दिलेल्या टिप्पणी विभाग तर्फे संप्रर्क करू शकता मी आपल्या शंकांना लवकरात लवकर उत्तर पाठवायचा प्रयत्न करेन. माझ्या वेबसाईट ला विझिट केल्या बद्दल आपले मनापासून आभार.

You Might Also Like

0 Comments

Leave a Reply